पुण्यातील रूपाली, वैशाली, गुडलक हॉटेल्स अस्वच्छ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणेकरांचे चवीने खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्यवर्ती भागातील पाली, वैशाली आणि कॅफे गुडलक या हॉटेलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता आणि घाण असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए)ने नुकत्याच केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे या हॉटेलांमधील पदार्थासंदर्भात आरोग्याच्या दृष्टीने अपायकार आहेत का असा सवाल निर्माण झाला आहे.

फर्ग्युसन रस्त्यावरील रूपाली, वैशाली आणि कॅफे गुडलक ही पुणेकरांची आणि विशेषतः तरुणाईची अत्यंत आवडीची हॉटेल या हॉटेलांमध्ये दिवसरात्र खवय्यांची कायम गर्दी असते. अस्वच्छतेसंदर्भात एफडीएने या हॉटेलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.