
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवनेरी सेवा मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धेतील प्रथम श्रेणी व्यावसायिक गटामध्ये रिझर्व्ह बँक आणि आर. आर. एंटरप्राइज यांच्यामध्ये जेतेपदाची लढाई रंगणार असून महाविद्यालयीन गटात इंदिरा गांधी व वंदे मातरम् यांच्यामध्ये अंतिम लढत होणार आहे. प्रथम श्रेणी व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या संघाने गंधेकर इलेक्ट्रिकल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. रिझर्व्ह बँक या बलाढ्य संघाने गंधेकर इलेक्ट्रिकल्सचा 30 विरुद्ध 29 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. प्रथम श्रेणी व्यावसायिक गटाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात आर. आर. एंटरप्राइज संघाने युवा स्पोर्टस् संघाला 44 विरुद्ध 19 असे 25 गुणांनी सहज हरवले.



























































