कश्मीर खोऱ्यात धुमश्चक्री; तीन जवान शहीद, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू- कश्मीरमध्ये झालेल्या दोन चकमकींत लष्करी जवानांनी पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले तर दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकामकीत सेनेचे तीन जवान शहीद झाले आहेत. तीन दहशतवादी उत्तर कश्मीरच्या कुलगाम जिह्यात मारले गेले तर दोन दहशतवादी राजौरी जिह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये घुसखोरी करताना लष्कराच्या जवानांनी टिपले. चकमकीत दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यात एक दहशतवादी संघटनेचा कमांडर होता.

सात नागरिकांच्या मृत्यूनंतर कश्मीरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून विभाजनवाद्यांनी उद्या सोमवारी कश्मीर बंदचा नारा दिला आहे.

कुलगाम येथील चकमकीचा परिसर निर्मनुष्य करीत असताना स्थानिक नागरिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. तेथून सुरक्षा दल हटविल्यानंतर जमावाने दहशतवाद्यांची शस्त्र्ाs आणि दारूगोळा जमा केला. त्याचवेळी काही ग्नेनेड आणि स्फोटकांचा स्फोट झाला. यात सातजण ठार, तर 40 लोक जखमी झाले. मृतांमध्ये एका दहावर्षीय बालकाचा समावेश आहे. सुरक्षा दलाला एक जळालेला मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटू शकली नाही.

घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा आणि दोन एके 47 रायफली सापडल्या. जखमी जवानास उधमपूर कमांड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सीमेवरील सर्व चौक्यांवर हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे.