
1 / 8
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे शोले चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. पण धर्मेंद्र विवाहीत होता व त्यांच्या बायकोने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्विकारून हेमा मालिनीशी लग्न केले होते.
इश्क चित्रपटाच्या वेळी एकमेकांच्या प्रेमात पडलेले काजोल आणि अजय देवगण यांनी या चित्रपटानंतर काही महिन्यातच लग्न केले. आता त्यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत.
खिलाडी आणि झुल्मी या चित्रपटांच्यावेळी एकमेकांच्या प्रेमात पडलेले ट्विंकल आणि अक्षय कुमार हे बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाते.
गुरू, उमराव जान, धूम २ या चित्रपटात एकत्र काम करताना ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी लग्न केलं.
सैफ अली खान आणि करिना कपूर हे टशन या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले.































































