
सामना प्रतिनिधी, येवला
पाण्याच्या शोधात तालुक्यातील सायगाव येथे एका कोरड्या विहिरीत घोडा पडल्याची घटना घडली. पाण्याच्या शोधात तालुक्याच्या पूर्व भागात आजपावेतो हरणांसह काळवीट पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात आतापासूनच जनावरांच्या चाऱयाबरोबरच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यात जनावरे स्वत:च पाण्याचा शोध घेत आहेत.
दोन दिवस घोडय़ाचा शोध घेत कुणीच आले नाही. मग अमोल कोथमिरे, हिरामण पठारे, पवन आहेर, मयूर कोथमिरे, योगेश पठारे, रावसाहेब पठारे, सागर पगारे, मिठू बागूल, पोपट पठारे, उमेश पठारे, सोनू पठारे, सचिन आव्हाड, मुस्कान कांबळे या तरुणांना एकत्र घेऊन कोथमिरे यांनी क्रेन मागवली.
अतिशय शिताफीचे प्रयत्न करून क्रेनच्या साहाय्याने घोडा सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात तरुणांना यश आले. घोडय़ाला बाहेर काढून पाणी पाजून सोडून देण्यात आले. एवढय़ा खोल व कोरडय़ा झालेल्या विहिरीत घोडा पडला असतानादेखील घोडय़ाला किरकोळ दुखापत झाली, मात्र गंभीर दुखापत कुठेच झाली नाही, याचे नवल परिसरातील, गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक यांना झाले. तसेच या तरुणांचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. म्हणतात ना, वेळ आली होती पण काळ आला नव्हता.
summary- horse fallen down in dry well
























































