सामना ऑनलाईन । अयोध्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परतले. त्यांच्या या अयोध्या दौऱ्याचे अपडेट, फोटो, व्हिडीओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.
आजचा अग्रलेख : महाराष्ट्र ते अयोध्या रामसेतू
#MissionAyodhya Live:
- ढोल ताशांचा गजर, जय श्रीराम, जय शिवसेनाच्या घोषणांनी परिसर दणाणला
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत
- विमनातळ परिसर जय श्रीराम, जय शिवसेना, हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकारच्या घोषणांनी परिसर दणाणला
- कलिनाच्या गेटवर उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी
- उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार
- उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना
- उद्धव ठाकरे यांनी केली सामनाशी खास बातचित
- मंदिर हे होणारच पण जर या सरकारने मंदिर नाही बांधलं तर भविष्यात हे सरकार नाही बनणार – उद्धव ठाकरे
- जर राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचाय तर निवडणूकीत या मुद्द्याचा वापर करू नका – उद्धव ठाकरे
- प्रभू रामचंद्र १४ वर्ष वनवासात होते आणि आता ते तुरुंगवासात आहेत असं वाटतं – उद्धव ठाकरे
- रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नव्हतं याच दुख वाटत होतं – उद्धव ठाकरे
- हिंदू मार खाणार नाही, आता हिंदू प्रश्न विचारणार, मंदिर कधी बनणार – उद्धव ठाकरे
- हिंदुच्या भावनांशी खेळ करू नका- उद्धव ठाकरे
- निवडणुकीच्या आधी राम राम आणि नंतर आराम करतात, अनेक वर्ष झाली तरी आपल्या रामलल्लाचं मंदीर नाही बांधलं गेलं ही दुखाची गोष्ट आहे. – उद्धव ठाकरे
- सर्वांना धन्यवाद देतो- उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
- थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार

- उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलवर परतले, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद
Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray returns to the hotel after visiting the Ram Lalla temple earlier today. pic.twitter.com/Py0I4yPdKd
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
- उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले रामलल्लाचे दर्शन
असंख्य हिंदूच्या राम मंदिर निर्माण विषयीच्या जनभावना मनाशी घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रभू राम लला जीं चे दर्शन घेतले.
पक्षप्रमुखांच्या अयोध्या यात्रेने हिंदूंच्या राम मंदिर होण्याच्या आशेला नवचैतन्य मिळाले.#ThackerayinAyodhya
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) November 25, 2018
- उद्धव ठाकरे रामजन्मभूमीवर पोहोचले
<
- उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घेणार राम लल्लाचे दर्शन, रामजन्मभूमीवर कडेकोट बंदोबस्त
- देशभरातील वृत्तपत्रांमध्ये उद्धव ठाकरेच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा
- उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती संपन्न
#WATCH: Shiv Sena chief Uddhav Thackeray along with his son Aditya Thackeray offers prayer at Sarayu River in Ayodhya. Shiv Sena will hold an event in the city tomorrow over the matter of #RamTemple. pic.twitter.com/oJdSnVVwck
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2018
- वेद मंत्रोच्चारात शरयूच्या तीरावर आरतीला सुरुवात
- राज्यभरात शिवसैनिकांद्वारे महाआरत्या
- मुंबईतील मंदिरांबाहेर महाआरत्यांसाठी गर्दी जमू लागली
- लक्ष्मण किलावर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा
- अयोध्या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही – उद्धव ठाकरे
- हिंदू आता मार खाणार नाही, ना आता स्वस्थ बसणार – उद्धव ठाकरे
- मंदीर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा, राम मंदिराचा अध्यादेश आणणार असाल तर माझा पक्ष शिवसेना नक्की समर्थन देणार – उद्धव ठाकरे
- राम मंदिरासाठी किती वर्ष वाट बघणार, मंदिर कधी बांधणार याची तारिख आधी सांगा – उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
Humein aaj mandir banne ki tareekh chahiye. Pehle mandir kab banaoge wo batao, baaki baatein to baad me hoti rahengi. Aaj mujhe tareekh chahiye: Shiv Sena Chief Uddhav Thackeray in Ayodhya pic.twitter.com/U68rsl5y4Y
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2018
- झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला इथे आलोय – उद्धव ठाकरे
- मी राजकारण करायला इथे आलेलो नाही – उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गौरी पूजन, गणेश पूजन आणि कलश पूजन केले
- जय श्रीराम, जय शिवसेनाच्या घोषणांनी परिसर दणाणला
- शिवसेना उत्तर प्रदेशचे राज्य प्रमुख ठाकूर यांनी या सोहळ्यात रामंदिर निर्माणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चांदीची वीट सुपूर्द केली.

- उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या पादुकांचे पूजन
- उद्धव ठाकरे यांनी सोबत आणलेल्या शिवनेरीवरील पवित्र मातीच्या मंगल कलशाचे अयोध्या वासियांकडू पूजन सुरू
- उद्धव ठाकरे यांचे लक्ष्मण किलावर जोरदार स्वागत, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणला
- लक्ष्मण किला बाहेर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तुफान गर्दी
- उद्धव ठाकरे यांच्या सन्मान सोहळा व आशिर्वादोत्सवाला सुरुवात
- उद्धव ठाकरे लक्ष्मण किलाकडे रवाना

- लक्ष्मण किला येथे संतमहंत, शिवसैनिकांची गर्दी

- उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेश सरकारकडून झेड प्लस सुरक्षा
- लक्ष्मण किला येथे होणाऱ्या सोहळ्यात रामभक्त हनुमानाच्या वेशात दाखल झाला आहे. पाहा व्हिडीओ
- उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलमध्ये पोहोचले, काही वेळातच लक्ष्मण किलावर पोहोचणार
- लक्ष्मण किलावर मंत्र पठणाला सुरुवात, संताकडून पुजनाला सुरुवात
- उद्धव ठाकरे लक्ष्मण किलासाठी रवाना
- ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचे स्वागत
- शिवसेना मंत्र्यांकडून उद्धव ठाकरे व कुटुंबीयांचे स्वागत
- उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचले
- शिवसेनेचे सर्व नेते विमानतळावर दाखल
- फैजाबाद एअरपोर्टवर फुलांची सजावट
- शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज, फैजाबाद विमानतळावर फुलांच्या पायघड्या
- संपूर्ण अयोध्येत जागोजागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची पोस्टर्स, पाहा व्हिडीओ
- सन्मान सोहळा व आशिर्वादोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची क्षणचित्रं
- पाहा अयोध्येतील आशिर्वादोत्सवाच्या तयारीचा व्हिडीओ
- पुण्यात तुळशीबागेतील राम मंदिरामध्ये शिवसेना प्रवक्त्या आमदार निलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
- उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना…
Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray leaves from his residence. He will reach Uttar Pradesh’s Ayodhya today for a two-day visit. VHP and Shiv Sena will hold separate events in the city tomorrow over the matter of #RamTemple. pic.twitter.com/tPFewtVLVN
— ANI (@ANI) November 24, 2018
- उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येस निघाले, कलिना गेटजवळ पोहोचले
- शरयू तीरावर ‘जय श्रीराम’, ‘हर हिंदू की यही पुकार पहिले मंदिर फिर सरकार’ च्या घोषणा
- ‘मातोश्री’ बाहेर मीडियाची गर्दी, पोलीस मोठ्याप्रमाणावर तैनात
- शिवसैनिकांच्या दोन ट्रेन अयोध्येत पोहोचल्या
- घोषणा: जो नाही रामाचा, तो नाही कामाचा… , जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा…
- उद्धव ठाकरे विशेष विमानाने अयोध्येत पोहोचणार
Photo:- पाहा अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी
- उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी शिवसेन नेते , खासदार संजय राऊत यांच्याशी खास बातचित
- संपूर्ण देशातील मीडियाचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे
- मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक अयोध्येत दाखल
- लखनौपासून अयोध्या नगरीपर्यंत स्वागताचे प्रचंड मोठे फ्लेक्स
- शिवसेना नेत्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली… शुक्रवारी रात्री पाहणी केली तेव्हाची दृश्य खास सामनाच्या वाचकांसाठी
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी पूर्ण




























































