
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येतील नया घाट येथे शरयू आरती सुरू होताच मुंबईसह महाराष्ट्रातील मंदिरांमध्येही घंटानाद दुमदुमणार आहे. अनेक मंदिरांमध्ये शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी या मंदिरांचीही आज सजावट करण्यात आली.
मुंबईत शनिवार, 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता विठ्ठल मंदिर-दहिसर (प.) स्टेशनजवळ, मुलुंड (प.) मारुती मंदिर, मानखुर्द शिवाजीनगर-गणेश मैदान-शाखा क्र. 26-धारावी, कुर्ल्यातील जागृत विनायक गणेश मंदिर, वडाळा, माहीम, प्रभादेवी-सिद्धिविनायक मंदिर-वरळी डाऊन मिल समोर, लोअर परळ, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा-श्रीराम मंदिर, झावबावाडी-ठाकूरद्वार येथे महाआरती होईल.
























































