शिवसेनेची कsssडक तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरंग खरे । अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची अयोध्यानगरीला जबरदस्त उत्सुकता आहे त्यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण अयोध्येत स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. अयोध्येत कुठेही फिरलात तर तुम्हाला आपण अयोध्येत आहोत का महाराष्ट्रात असा प्रश्न पडायला लागतो.

शिवसेना नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अयोध्येत जी तयारी केली आहे ती पाहून ‘…आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील कडssक हा शब्द सहज तोंडातून निघतो. भगव्या पताका, झेंडे यामुळे संपूर्ण परिसर भगवा झाला आहे. शिवसेना नेते आणि पदाधिकारी रात्री उशिरापर्यंत लक्ष्मण किलामध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमाची जातीने पाहणी करत होते.

उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या दोन दिवशी संपूर्ण धुरा सांभाळणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की ” वनवासातून आल्यानंतर भगवान श्रीराम यांच्या झालेल्या राज्याभिषेकानंतर अयोध्यानगरी इतकी कधीच सजली नव्हती. हा क्षण महाराष्ट्र आणि शिवसेनेसाठी ऐतिहासिक आहे. अशा प्रकारचे भाग्य अयोध्येत तरी कोणत्याही नेत्याच्या वाट्याला आलेले नाही”. अयोध्येतील बहुसंख्य लोकांना उद्धव ठाकरेंना जवळून पाहण्याची इच्छा आहे. त्यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाबद्दल संपूर्ण देशाला उत्सुकता आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम भव्य आणि अविस्मरणीय व्हावा यासाठी शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटत आहेत.