
सामना प्रतिनिधी। बुलढाणा
पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केल्यानंतर कामाच्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर सही घेण्यासाठी नागापूर सरपंचाकडून 500 रुपयांची लाच घेताना मेहकर पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओमप्रकाश सिताराम चिखलेकर (52) यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या फिर्यादीवरुन आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये 26 रोजी मेहकर पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओमप्रकाश सिताराम चिखलेकर यांनी पुर्णत्वाचे प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी 500 रुपये लाचेची मागणी केली होती. याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभालाला कळवण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात चिखलेकर अडकले. ही कारवाई बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शैलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा सापळा अर्चना जाधव, एएसआय शाम भांगे, पोकाँ. दीपक लेकुरवाळे, विनोद लोखंडे, विजय मेहत्रे यांनी यशस्वी केला.

































































