
चंद्रकांत पालकर । पुणे
माथाडी कायदा वाचवण्यासाठी माथाडी कामगार संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे. यामुळे मंगळवारी राज्यातील बाजारापेठांमध्ये सकाळुपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सर्व व्यापार थंडावलेला आहे. तसेच मुंबईतील आझाद मैदानात मोठ्याप्रमाणावर माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते जमणार आहेत.
माथाडी कामगारांची परिस्थिती बिकट होत चालली असून सरकार मात्र आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास तयार नाही. तेव्हा सरकारला जागं करण्यासाठी म्हणून आम्ही 27 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असल्याची माहिती कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्या आली आहे. तसेच बाजारपेठांमध्ये कामकाज बंद ठेवण्यात आल्याचे बोर्ड झळकले आहे. तसेच बंदला सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प असून सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.




























































