आनंदवार्ता! राज्यात 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच खूशखबर आहे. 1 जानेवारी 2019 पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे अशी माहिती अर्थ राज्य मंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेमध्ये दिली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा आयोग लागू करण्यात आल्यानंतर त्याच तारखेला केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकराने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.या समितीचा अहवार येत्या 5 डिसेंबरला प्राप्त होणार आहे. या समितीच्या शिफारशी स्वीकारून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलाजणार आहे. तसेच हा अहवाल येण्यास उशीर झाला तरी 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल असे आश्वासनही केसरकर यांनी दिले. तसेच सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वीस हजारांपेक्षा जास्तच वेतन मिळेल असेही केसरकर यावेळी म्हणाले.