नगर महापालिका निवडणूक : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या भाजपाचा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम हा नगरमधून विजयी झाला आहे. छिंदम हा तब्बल 2 हजार मतांनी विजयी झाला आहे. नगरच्या वॉर्ड क्रमांक 9मध्ये अपक्ष म्हणून छिंदम विजयी झाला आहे.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द व गलिच्छ भाषा वापरणार्‍या शिवद्रोही श्रीपाद छिंदमच्या कृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता, परंतु हा राग मतपेटीमधून दिसून आला नाही आणि छिंदम 2 हजार मताने विजयी झाला.

याआधी मतदानाच्या दिवशी म्हणजे रविवारी श्रीपाद छिंदम यांच्या भावाने म्हणजेच श्रीकांत छिंदमने चक्क मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. त्यासंदर्भात आज श्रीकांत छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.