निवेदिता माने शिवसेनेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

माजी खासदार निवेदिता माने यांनी आज असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कोल्हापुरात राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.मी शिवसेना सोडायला नको होती अशी स्पष्ट कबुली निवेदिता माने यांनी यावेळी दिली आणि खासदार राजू शेट्टी यांचा पर्दाफाश करून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे त्या म्हणाल्या.

शिवसेना कोल्हापूर संपर्क नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, कोल्हापूर जिल्हयात शिवसेनेचे सहा आमदार असून अजून चार आमदार निवडून आणणार. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सचिव मिलिंद नार्वेकर, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.