सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील सर्मथनगर येथे बंद असलेल्या घराच्या मागील बाजूच्या दरवाची कडी तोडून चोरट्यांनी लाख रुपयांच्या ऐवजांची चोरी केली. चोरट्यांनी घरातील 1 लाख 23 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने,अडीच हजार रुपये किमंतीच्या चांदीच्या वस्तू आणि पाच हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
जान्हवी दंवडे आणि त्यांचे पती कामावर गेले असताना चोरट्यांनी घरात शिरून चोरी केली.घरातील लोखंडी कपाटातील दागिने आणि भिंतीवरील पर्समधील रोकड चोरट्यांनी लंपास केली.या चोरीचा गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
































































