टंकलेखन परीक्षेचे  हॉलतिकीट ऑनलाइन,  मराठी, हिंदीत परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शासकीय संगणक टंकलेखन (टायपिंग) प्रमाणपत्र परीक्षा 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध झाली आहेत. टंकलेखन संस्थांच्या लॉगीनमधून परीक्षार्थींना हॉलतिकिटाचे प्रिंट घेता येईल.

5 ते 11 जानेवारीदरम्यान इंग्रजी विषयाच्या प्रतिमिनीट 30 ते 40 शब्दांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीदरम्यान मराठी, हिंदी विषयाची परीक्षा होणार आहे. यातील इंग्रजी विषयाची हॉलतिकिट टंकलेखन व लघुलेखन संस्थेच्या लॉगिनवर आहेत. हॉलतिकिटावर काही  चुका असतील तर त्या दुरुस्तीसाठी संस्थांनी परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही विषयांसाठीच्या परीक्षेत ईमेल, लेटर, स्टेटमेंट या प्रश्नांसाठी स्पीड पॅसेडमध्येही बॅकस्पेस व डिलीट कीज वापर करण्याची परवानगी असल्याचे परीक्षा परीषदेने स्पष्ट केले आहे.