
सामना ऑनलाईन। मुंबई
थंडीत आईस्क्रिम खावे कि खाऊ नये हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. कारण थंडीत आईस्क्रिम खाल्ल्यास घसा बसतो, नाक गळायला लागत असं म्हटलं जातं. पण तज्ज्ञांच्या मते थंडीत आईस्क्रिम खाल्ल्याने नुकसान तर होत नाहीच उलट फायदाच होतो. जाणून घेऊ या फायद्यांबद्दल
घशाची खवखव थांबते…आईस्क्रिम थंड जरी वाटत असलं तरी ते गरम असतं. यामुळेच जेव्हा घसा दुखत असतो, खवखवत असतो तेव्हा जर तुम्ही आईस्क्रिम खाल्लं तर घशाला आराम मिळतो.

त्याचबरोबर आईस्क्रिम मनावरील तणावही घालवतो. यामुळे तुम्ही केव्हाही आईस्क्रिम खा. त्यानंतर तुम्हांला एक वेगळीच अनुभूती मिळेत. शांत वाटतं.
आईस्क्रिम दूधापासून तयार होतं. दूधात प्रोटीन असतं. ज्याची आपल्या शरीराला गरज असते. प्रामुख्याने शरीरात मांसपेशी,त्वचा आणि हाडे मजबूत होण्यासाठी प्रोटीनची गरज असते.

तसेच आईस्क्रिममध्ये व्हिटामिन ए, बी आणि बी-12 चे प्रमाण अधिक असते. व्हिटामिन ए मुळे त्वचा, हाडे व रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
दूधात कॅल्शियमही असते ज्यामुळे हाडं मजबूत होतात. यामुळे ऊन असो पाऊस असो वा थंडी आईस्क्रिम खाणे कधीही चांगले.



























































