‘रेडीमिक्स’ 8 फेब्रुवारीला चित्रपटगृहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

8 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना ‘रेडीमिक्स’चे वेड लावणार आहेत. प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच फेब्रुवारी महिन्याचे विशेष आकर्षण असते. जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्यात वेगळं काही करू पाहणारी नुपूर ही सुंदर तरुणी येते, आणि त्यानंतर त्याचे आयुष्य वेगळेच वळण घेते. इथूनच त्याची रोमाँटिक कथा सुरु होते. वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचे रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारे आहे. त्यांच्या जोडीला अभिनेते सुनील तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी सहकलाकारांनी भरलेले रंग म्हणजे खरंच एक बडा धमाका आहे.