
सामना प्रतिनिधी । पुणे
अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात ‘परवडत नसेल तर शिक्षण सोडून द्या’ असं मी बोललोच नाही. तसेच चित्रीकरण करणाऱ्या मुलाला अटक करायलाही मी सांगितले नव्हते. हे खोटं असून एकहीजण क्लिप दाखवत नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत असे सांगत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल (दि.6) झालेल्या प्रकरणाबद्दल सारवासारव केली.
































































