नंदुरबार : नर्मदा नदीत बोट उलटून 5 ठार, अनेक बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात मोठी दुर्घटना झाली आहे. धाडगाव तालुक्यातील भुशा पॉईंटजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नर्मदा नदीत उलटण्याची माहिती मिळत आहे. या बोट दुर्घटनेमध्ये पाच जण मृत्यूमुखी पडले असून 39 जणांची प्रकृती गंभीर आहे. बोटीमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळते.

प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी भुशा पॉईंटजवळ प्रवाशांची वाहतूक करणारी बोट बुडाली. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने आणि स्थानिकांना घटनास्थळी धाव घेतली. ही घटना दुर्गम भागात घडल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत, आतापर्यंत चौघांना नदीतून सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. जखमींना तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींपैकी 39 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. अद्यापही काही जण बेपत्ता असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.