
सामना प्रतिनिधी, मुंबई
विधिमंडळाचे अधिवेशन 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 1 मार्चपर्यंत ते असणार आहे. यामध्ये राज्याच्या अर्थसंल्पाऐवजी लेखानुदान मांडले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. लोकसभेची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. मार्च महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार नाही. त्यामुळे सरकारला लेखानुदान मांडावे लागणार आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

























































