
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना शाखा क्रमांक 64च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओव्हर आर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेट स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. शाखाप्रमुख हारून खान यांच्या संकल्पनेतून खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग लाभला. उपविभागप्रमुख विष्णू कोरगावकर, मारवाडी युवा मंच उपाध्यक्ष सुनील खाबिया, शिववाहतूक सेना सरचिटणीस सुयोग माने यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी शाखाप्रमुख एकनाथ केरकर, उपशाखाप्रमुख तुषार राऊत, राजू मोरे, संजय घागरे, कार्यालयप्रमुख विष्णू मोरे, उपशाखा संघटक मनीषा परमार, विनिता घाडगे, हेमा पटेल, ग्राहक सेना रमेश मालवणकर, हेमंत मयेकर, अरविंद देशमुख, साजीद भागवानी, दुर्गेश घाग, हाशीम खान, उपशाखाप्रमुख अब्बास शेख, विवेक देसाई, लोकेश मोरे या मान्यवरांची उपस्थिती होती.


























































