कर्जत नगरपालिकेवर भगवा डौलाने फडकला, शिवसेनेच्या सुवर्णा जोशी नगराध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suvarna-joshi

सामना प्रतिनिधी । कर्जत

राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धोबीपछाड देत कर्जत नगरपालिकेवर आज शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. थेट नगराध्यक्षासह शिवसेना-भाजप-रिपाइंच्या 10 शिलेदारांचा दणदणीत विजय झाला आहे. शिवसेनेच्या सुवर्णा जोशी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. सुवर्णा जोशी यांना 9969 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या प्रतिक्षा लाड यांना 7263 मते मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या सर्व राजकीय गणितांना धक्का देत 25 वर्षांनी कर्जत नगरपालिकेत परिवर्तन शिवसेनेने हे परिवर्तन घडवून आणले आहे. शिवसेनेने येथे 6 जागांवर विजय मिळवला तर भाजपने 4 जागांवर यश मिळवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या.