
सामना ऑनलाईन । मुंबई
शॅले हॉटेल्स लिमिटेड (“कंपनी”) या भारतातील महत्त्वाच्या मेट्रोमध्ये हाय-एंड हॉटेल्सची मालकी असणाऱ्या, विकासक व मालमत्ता व्यवस्थापक असणाऱ्या या कंपनीने जानेवारी 29, 2019 रोजी प्रारंभी समभाग विक्रीला (आयपीओ) सुरुवात केली आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या 9,500 दशलक्ष रुपयांच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) आणि 24,685,000 पर्यंतच्या (“ऑफर्ड शेअर्स”) इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफर फॉर सेलमध्ये समाविष्ट असेल (i) रवी सी. रहेजा यांच्यातर्फे 5,550,000 पर्यंत इक्विटी शेअर्स; (ii) नील सी. रहेजा यांच्यातर्फे 5,550,000 पर्यंत इक्विटी शेअर्स; (iii) के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे 10,784,176 पर्यंत इक्विटी शेअर्स; (iv) पाम शेल्टर इस्टेट डेव्हलपमेंट एलएलपीतर्फे 800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स; व (v) आयव्हरी प्रॉपर्टीज अँड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे 2,000,824 पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “सेलिंग शेअरहोल्डर्स”, आणि अशी ऑफर फॉर सेल “ऑफर फॉर सेल”).
बिड/ऑफर जानेवारी 31, 2019 रोजी बंद होणार आहे. ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर 275 रुपये ते 280 रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण 53 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 53 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
जेएम फिनान्शिअल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड व मॉर्गन स्टॅन्ली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत.
फ्रेश इश्यूमधील निव्वळ रकमेचा (“नेट प्रोसीड्स”) वापर पुढील कारणांनी केला जाणार आहे:
(i) विशिष्ट कर्जांची परतफेड; व (ii) एकंदर कॉर्पोरेट उद्दिष्ट
*बीआरएलएम यांच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, आमची कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स अँकर इन्व्हेस्टर्सच्या सगभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक वर्किंग डे अगोदर, म्हणजे सोमवार, जानेवारी 28, 2019 रोजी असेल.
































































