दहावीच्या विद्यार्थ्यांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द केल्याचा निषेध, आज युवासेनेचा महामोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

दहावीच्या विद्यार्थ्यांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द करून तब्बल 17 लाख विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण विभागाने अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ उद्या 31 जानेवारी रोजी युवासेना पुणे येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर (एसएससी बोर्ड) महामोर्चा काढणार आहे. पुणे येथील बीएमसीसी कॉलेजशेजारील बोर्डाच्या कार्यालयावर सकाळी 11 वाजता हा मोर्चा धडकणार आहे. दहावीच्या परीक्षेतील 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या  निर्णयाला विरोध करणाऱ्या पालकांच्या पाठीशी युवासेना ठामपणे उभी आहे. युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले, तसेच हा निर्णय रद्द करण्यासाठी ऑनलाइन सहय़ांची मोहीमसुद्धा राबवली, परंतु शालेय शिक्षण विभागाने यावर कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात युवासेनेचा महामोर्चा निघणार आहे.