
सामना ऑनलाईन । प्रयागराज
योगगुरू रामदेवबाबा यांनी कुंभमेळय़ात साधुसंतांना धूम्रपान सोडण्याचे आवाहन केले आहे. आपण ज्यांना गुरू मानतो ते भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी कधीच धूम्रपान केले नाही. मग आपणच का, असा सवालही रामदेवबाबांनी केला. स्वतःचे घर, आईवडिलांना सोडून अनेकजण साधू बनून कठीण तपश्चर्या करतात. जर आपण आईवडिलांना सोडू शकतो तर धूम्रपान सोडणे अवघड नाही, असेही रामदेवबाबा म्हणाले.

























































