
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तब्बल वर्षभर कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सोनालीने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ही माहिती खुद्द सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर दिली आहे.
“भरपूर आराम केल्यानंतर सेटवर परतले आहे. अनेक स्तरावर अनेक प्रकारे हाताळले गेले आहे. एक विचित्र जाणीव होत आहे. कामावर परतण्याचा आनंद अनुभवतेय. कामावर परतण्याचा आनंद शब्दात सांगता येत नाहीये. कॅमरासमोर पुन्हा एकदा व्यक्त होणार आहे. भावना व्यक्त करायला आवडतात, पण, काही महिन्यांपासून माझ्या भावना जशा मृत होत आहेत, असंही सोनालीने म्हटलं आहे. कॅन्सरवरील उपचारादरम्यान सोनालीने पुस्तक वाचन व लिखाणावर भर दिला. त्यातूनच ती व्यक्त होत गेली.

























































