
सामना प्रतिनिधी । तिरुपती
तिरुपतीच्या श्री गोविंदराज स्वामी मंदिरातून सोन्याचे 1.3 किलो वजनाचे तीन मुकुट गायब झाले आहेत. प्राचीन मंदिरात भगवान व्यंकटेश, श्रीलक्ष्मी आणि श्री पद्मावती यांच्या मूर्तींवर हे मुकुट चढवलेले होते. शनिवारी रात्रीपासून ते गायब झाल्याचे तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले. चोरांचा शोध घेण्यासाठी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. देवस्थानने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

























































