
सामना प्रतिनिधी । डोंबिवली
रेल्वे रूळ ओलांडून घर गाठण्याचा शॉर्टकट कल्याणच्या एकाच कुटुंबातील तिघांच्या जिवावर बेतला. भरधाव लोकलने मायलेकासह तिघांना जागीच चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. डोंबिवली – कोपरदरम्यान ही दुर्घटना घडली. सुनिता भंगाळे (62) रा. कोपर, प्रीती राणे (26), नीलेश राणे (2) कोळसेवाडी अशी मृतांची नावे असून भास्कर राणे (65) गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणच्या कोळसेवाडी येथे राहणारे राणे कुटुंब घरगुती कार्यक्रमासाठी कोपर येथे आले होते.





























































