
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची दुसरी मुलगी सौंदर्या ही पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी तिचे लग्न होणार असून उद्योजक विशगन वंगामुडी यांच्याशी ती विवाहबद्ध होईल. चेन्नईमध्ये हे लग्न होणार आहे.
#OneWeekToGo #BrideMode #Blessed #VedVishaganSoundarya #Family ❤️❤️❤️ pic.twitter.com/fJYkHp8J1l
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) February 4, 2019
चेन्नईमध्ये या ग्रँड वेडिंगची तयारी जोरात सुरू आहे. 10 जानेवारीपासून लग्नापूर्वीचे विधी सुरू होणार आहेत. यानंतर बरोबर एक महिन्याने 11 फेब्रुवारीला सप्तपदी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या लग्ना सिनेजगतासह अनेक बडे लोक हजेरी लावण्याची शक्यता आहे. यासाठी रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी 10 ते 12 फेब्रुवारीदरम्यान पोलीस सुरक्षेचीही मागणी केली आहे.
Celebrations at the Rajinikanth household !!! Here’s wishing you all a very happy #PettaPongal #PettaParaak ☺️ pic.twitter.com/KS07v1QrrA
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) January 15, 2019
सौंदर्या आणि उद्योजक विशगन यांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता. याआधी सौंदर्याने 2010 मध्ये उद्योजक अश्विन कुमार याच्यासोबत सात फेरे घेतले होते. परंतु काही कारणास्तव दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. या दोघांना 4 वर्षाची एक मुलगीही आहे. सौंदर्या ही एपेक्स लॅबोरेटरीज या कंपनीमध्ये एक्जिक्यूटिव डायरेक्टर या पदावर कार्यरत असून या कंपनीचे फाऊंडर होणारा पती विशगन याचे वडील सुलूर वंगामुडी हे आहेत. विशेष म्हणजे सौंदर्याप्रमाणे विशगन याचेही हे दुसरे लग्न आहे.
#Maari2FromToday celebration time!!! Enjoy the maari swag in theatres people !!! #RowdyBaby pic.twitter.com/vdZ3g4hBPt
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) December 21, 2018




























































