सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वीचे शेवटचे भाषण केले. शेवटच्या अधिवेशनात शेवटचे भाषण करताना मोदींनी विरोधांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी मोदींनी सत्तेत आल्यापासून ते आतापर्यंतच्या कामांचा पाढा वाचला.
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा, पण हे करताना देशाला वाईट म्हणू नका. तसेच सध्या विरोधकांची टीका म्हणजे ‘चोराच्याच उलट्या बोंबा’, असल्याचे मोदी म्हणाले.
PM Narendra Modi in Lok Sabha: Modi ki aalochna karte karte, BJP ki aalochna karte karte, desh ki buraii karne lagte hain. https://t.co/VJ6iQ84u5C
— ANI (@ANI) February 7, 2019
काँग्रेस सत्ता आपला हक्क असल्याचे मानते. तसेच 55 वर्षांवर आमचे 55 महिने भारी असल्याचेही मोदी म्हणाले. काँग्रेसने निवडणूक आयोगाचा अपमान केला आहे. महाभियोगच्या नावाखाली काँग्रेसने भिती घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने निवडून आलेले सरकार बरखास्त करण्याचे काम केले, तसेच काँग्रेसला संस्थांच्या मानापमानाच्या बाता करण्याचा हक्क नाही, कारण मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय पत्रकार परिषदेत फाडण्याचे काम त्यांनी केल्याचे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेसने लष्कराचाही अपमान केल्याचे ते म्हणाले. महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.
PM Modi: Congress insults Army, calls the Army Chief a ‘Gunda’ but it is Modi who is destroying institutions? Congress leaders create stories that Indian Army is planning a coup but it is Modi who is destroying institutions? https://t.co/Hy85FSq9Sz
— ANI (@ANI) February 7, 2019
तसेच देशाची अर्थव्यवस्था आज जगात 6 व्या क्रमांकावर आहे. काही वर्षापूर्वी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात हिंदुस्थानत होत असल्याचंही मोदींनी सांगितलं. तसेच साडे चार वर्षात केलेल्या कामांचाही उल्लेक यावेळी मोदींनी केला.
PM in Lok Sbaha: In last 4 1/2 years India became 6th largest economy from the 10-11th largest.When we reached 11th position then people, who cannot even be seen in opposition now, praised themselves.They felt proud on reaching 11th, why are they saddened when we have reached 6th pic.twitter.com/NNeCsuXohP
— ANI (@ANI) February 7, 2019
























































