कोकणचा हापूस आंबा आला बाजारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील भाजीपाला लिलाव मार्केटमध्ये हंगामापूर्वीच कोकणचा हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. दाखल झालेल्या कोकणी हापूसच्या 25 पेट्यांना 850 रुपये डझन इतका दर मिळाला आहे. 50 वर्षाच्या इतिहासात कुरुंदवाड मार्केट मध्ये फेब्रुवारी महिन्यात आंबा विक्रीसाठी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. थंडीचे आंबा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

फळांचा राजा अशी ख्याती असलेल्या आंब्याला सर्वत्र मागणी असते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी,वेंगुर्ले या परिसरातील आंब्यांना परदेशातही मागणी असते. बदलते वातावरण आणि वाढत्या थंडीचा परिणाम आब्यांच्या मोहोरावर होत असतो. पण याची सांगड घालून आंबा उत्पादक आंब्याचे पीक घेण्याकडे वळत आहेत.

तालुक्यातील कुरुंदवाड येथील हजरत दौलतशहा वली भाजीपाला मार्केटात कोकणातील सावंतवाडी,वेंगुर्ले देवगडचा हापूस आंबा दाखल झाला आहे.850 रुपये डझन इतक्या उच्चांकी दराने मुन्ना कोल्हापुरे या नागरिकांने आंबा खरेदी करून लिलावाला शुभारंभ केला.

दरम्यान आज झालेल्या लिलावात शंभर डझनहून अधिक आंब्यांचा लिलाव झाला. येथील फळ भाजीपाला मार्केटात आज शनिवार आंबा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला गुलाम दस्तगीर बागवान, हाजी अल्ताफ बागवान, हाजी मोहम्मद कादरी बागवान या व्हेजिटेबल कमिशन व्यापारी यांच्याकडे आज पासून आंबा लिलावाला सुरुवात झाली.

यावेळी महंमद हनिफ बागवान, राजू बागवान, अर्शद बागवान, मुन्ना बागवान, गौस बागवान, समीर कोल्हापुरे आदींनी लिलावात सहभाग नोंदवून आंबा खरेदी केला.