शिरोळमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे नागरिकांनी निषेध रॅली काढत पाकिस्तानचा झेंडा जाळला. यावेळी संपूर्ण शहरात बंद पुकारण्यात आला होता. येथील येथील सर्व पक्षाचे नेते,कार्यकर्ते, व्यापारी संघटना, शेतकरी व नागरिकांतर्फे निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत पाकिस्ताच्या झेंड्याला शेण फासून तो जाळण्यात आला

जला दो …जला दो…पाकिस्तान जला दो’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद…’, अशा घोषणा देत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध यावेळी नोंदविण्य़ात आला. यावेळी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,आजी माजी नगरसेवक,विविध संघटनेचे आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.