
सामना ऑनलाईन । मुंबई
जानेवारीमध्ये पार पडलेल्या ‘जेईई मेन 1’ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘जेईई मेन 2’ या परीक्षेसाठी वेगळा अर्जक्रमांक आणि पासवर्ड मिळणार नाही. या विद्यार्थ्यांनी आधीच्याच म्हणजेच जेईई मेन 1 परीक्षेचा अर्जक्रमांक आणि पासवर्डनुसार जेईई मेन 2 साठी अर्ज करायचा आहे. तसेच नव्याने अर्ज करताना विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही. आधीच्या अर्जक्रमांकावरून ही माहिती आपोआपच अर्जात अपलोड होणार आहे. विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, लिंग, स्टेट कोड ऑफ एलिजिबीलीटी, जन्मतारीख यामध्ये बदल होणार नाही. विद्यार्थी केवळ परीक्षेचे ठिकाण, सेंटर, परीक्षा माध्यम यात बदल करू शकतात. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) जेईई 2 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 7 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात 7 ते 20 एप्रिलदरम्यान होणार आहे.





























































