माणसं जमवण्यासाठी नकलाकार आणावे लागतात, मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुखांचा भक्तीलॉन्स येथे मार्गदर्शन मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण व छगन भूजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नेस्तनाबूत होणारच, मुख्यमंत्र्यांचा नांदेडात हुंकार

महाआघाडीच्या प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसला सभेला माणसे जमवण्यासाठी असे नकलाकार आणावेच लागतात. छगन भुजबळ म्हणाले मांगा न्याय मिली जेल, जणू काही भुजबळ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य युध्दासाठी न्याय मागत होते. असा आव त्यांनी आणला होता. पण भुजबळांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना जेलमध्ये पाठविण्यात आले होते आणि तसे ही ते सुटलेले नाहीत. बेलवर आहेत हे लक्षात ठेवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.