जम्मू-कश्मीरमध्ये जवानांच्या जमवा जमवीमुळे पाकिस्तान घाबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jawan
फाईल फोटो

सामना ऑनलाईन। श्रीनगर

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई आणि 24 तासात कश्मीर खोऱ्यात बदललेली परिस्थिती बघून पाकिस्तान घाबरला आहे. त्यातच कश्मीरमध्ये 100 निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने दोन्ही देशात बिघडत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घाईघाईत एका विशेष समिती बनवली आहे. यास ‘क्राइसिस मैनेजमेंट सेल’ असे नाव देण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी सांगितले की ‘क्राइसिस मैनेजमेंट सेल सीमेवर होणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. ही समिती सर्व राजकारणी व्यक्तींना चालू घडामोडींचे अपडेटही देणार आहे. आठवड्याचे सातही दिवस ही समिती काम करणाऱ आहे.

‘क्राइसिस मैनेजमेंट सेल’ बनवण्याच्या 24 तास आधीच पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेचा दौरा केला होता. हिंदुस्थान पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती त्यांना वाटत असल्यानेच पाकिस्ताननेही सीमेवर मोठ्या संख्येने सैनिक जमा करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, हिंदुस्थान सरकारने कस्मीरमधील फुटीरतावाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. यात 150 जणांना आतपर्यतं अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये जमत ए इस्लामी . जम्मू कश्मीरचा प्रमुख हमीद फैयाज आणि JKLF चा यासिन मलिकचा समावेश आहे. तसेच या फुटीरतावाद्यांबरोबरच अनेक संशयितांना व जवानांवर दगडफेक करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हाच मुद्दा मांडत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नेपाळ व इतर अनेक परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.