
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थान सरकारकडून देखील या वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे. त्यामुळे आता अभिनंदन यांना सुरक्षित हिंदुस्थानात परत आणा अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे. सोशल मीडियावर #BringBackAbhinandan व #Abhinandan हे दोन हॅशटॅग सध्या व्हायरल होत आहेत.
Hopefully, IAF pilot #Abhinandan returns home soon as per the Geneva convention. Whole nation is praying for his safe return.#BringBackAbhinandan
— Shambhaviee Upadhyay (@shambhaviee_13) February 27, 2019
#SayYesToWar #Abhinandan #BringBackAbhinandan We Want Our Soldier Back or Else be ready for another SurgicalStrike3.
— shivaparvathi (@shivapa74084052) February 27, 2019
Bring him back to India!#BringBackAbhinandan
— Harini (@Harini15340043) February 27, 2019
हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी ठार झाले होते. मात्र आज सकाळी पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानच्या जवानांनी पाकिस्तानच्या त्यांना पिटाळून लावलं. दरम्यान पाकिस्तानात हिंदुस्थानचे एक मिग -21 विमान पडले असून त्यातील पायलट विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात सापडले आहेत. अभिनंदन यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनंदन सुरक्षित परतावे म्हणून सध्या संपूर्ण देश त्यांच्यासाठी सध्या प्रार्थना करत आहे.
We pray to God that Abinandan reaches back home safe..#BringBackAbhinandan
— Sucharitha (@Suchari06714662) February 27, 2019
Please save our wing commander #Abhinandan .@PMOIndia @IAF_MCC #IndianAirForce #BringBackAbhinandan pic.twitter.com/YWHms7H3KV
— Pal Parthiv Patel (@pal090) February 27, 2019
























































