संरक्षणमंत्र्यांनी घेतली अभिनंदन यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

शूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पाकड्यांनी प्रचंड मानसिक छळ केल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानात आपला शारीरिक नाही तर प्रचंड मानसिक छळ केला गेला, असे अभिनंदन यांनी सांगितले, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.  दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, हवाईदलप्रमुख बी. एस. धनुआ यांच्यासह हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन यांची भेट घेतली.

अभिनंदन दिल्लीमध्ये ‘कुलिंग डाऊन’ प्रोसेस अंतर्गत आर्मी रिसर्च ऍण्ड रिफिरेल हॉस्पिटल’मध्ये आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. अभिनंदन यांच्या उजव्या डोळ्याला इजा झालेली दिसते. त्यांचा डोळा लालसर आहे. शनिवारी अभिनंदन यांनी आपल्या कुटुंबाची भेट घेतली.  संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर वर्धमान यांची भेट घेतली. यावेळी अभिनंदन यांच्या पत्नी निवृत्त विंग कमांडर तन्वी मारवाह, मुलगा आणि बहिण आदिती उपस्थित होते.