विकासाच्या प्रश्नावर भाजप आमदार चिडले, म्हणे आता काय वेश्या नाचवायच्या का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बरेली

उत्तर प्रदेशमधील भाजप आमदर श्याम बिहारी लाल यांना एका तरुणाने विकास कामाबद्दल विचारले असता त्यांचा चांगलाच पारा चढला. आणि रागाच्या भरात त्यांनी अपशब्द वापरले. “आत काय वैश्या नाचवू का?” असा प्रश्न त्यांनी एका तरुणाला केला.

शुक्रवारी आमदार श्याम बिहारी नवादा नावाच्या गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे 100 ते 150 लोक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने त्यांना सांगितले की भाजपला विकास कामे करायची आहेत परंतु आपल्या भागात काहीच कामे झाली नसल्याची तक्रार केली. यावर तु बकवास करू नकोस असे श्याम बिहारी यांनी तरुणाला सुनावले. त्यानंतर तरुण म्हणाला की, “असंच चालू राहिलं तर तुम्ही पुन्हा निवडून नाही येऊ शकत.” यावर आमदारांचा पारा चढला आणि तरुणाला म्हणाले की, “तुला काय करायचंय ते करून घे, या गावात रस्ते झाले ते काय तु बनवलेस? तुझी काय इच्छा आहे? आत काय वैश्या नाचवू का?” असा सवाल त्यांनी या तरुणाला केला

यावर आमदार महोदयांना विचारले असता ते म्हणाले की आपण मतदारसंघात केलेल्या कामाबद्दल लोकांना सांगत होतो. तेव्हा हा तरुण सातत्याने व्यत्यय आणत असल्याचे त्यांनी सांगितले.