बोंबला आता! सक्काळी सक्काळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. Saamana Online  ला काही प्रवाशांनी फोन करून गाड्या उशिराने धावत असल्याबद्दलची माहिती दिली. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली असता माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने अप दिशेच्या धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचं या प्रवाशांनी सांगितले आहे.

या तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरील लोकल गाड्या, स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे अप दिशेकडील धीम्या मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झाली आहे.  महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेने देखील याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्येही इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.