नागपुरात आज शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नागपूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शुक्रवारी विदर्भातील शिवसेना-भाजप युतीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांच्या संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी नागपूरमध्ये येणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता डॉ. देशपांडे सभागृहात होणाऱया या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे माजी मंत्री, विदर्भाचे समन्वयक डॉ. दीपक सावंत यांच्यासहित शिवसेना-भाजपचे खासदार, राज्यसभा सदस्य, आमदार उपस्थित राहणार आहेत. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा या सहा लोकसभा मतदारसंघांतील युतीचे पदाधिकारी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराची आखणी या मेळाव्यात करण्यात येणार आहे.