नीरव मोदीच्या पत्नीविरोधात अजामीनपत्र वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटींची फसवणूक करणारा हिरे व्यापारी निरव मोदी याच्या पत्नीविरोधात मनी लॉन्डरिंग ऍक्ट (पीएमएलए)च्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ऍमी मोदी या घोटाळ्यात महत्त्वाची सूत्रधार असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ऍमी विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राची दखल घेत पीएमएलए कोर्टाने हे वॉरंट बजावले आहे. ऍमीने आपल्या आंतरराष्ट्रीय बँक खात्यातून घोटाळ्यातील 3 कोटी रुपये न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये घर घेण्यासाठी वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे.