
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून त्यांचे नाव बदलले आहे. मोदींनी त्यांच्या नावापुढे चौकीदार लावले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे ट्विटरवरचे नाव आत चौकिदार नरेंद्र मोदी झाले आहे. शनिवारी पंतप्रधानांनी मैं भी चौकिदार हे कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून त्यांचे नाव बदलले आहे.

पंतप्रधानांसोबतच भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह, रेल्वे मंत्री पियूष गोयल, कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद, क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकिदार लावले आहे. याव्यतिरिक्त भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकिदार लावले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘मैं भी चौकिदार’ हे कॅम्पेन देखील चांगलेच गाजेल.

























































