मध्य रेल्वेच्या कोकणसाठी आणखी आठ विशेष गाडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

कोकणात होळीच्या सणासाठी उसळणारी चाकरमान्यांची गर्दी पाहताना मध्य रेल्वेने कोकण मार्गावर आठ विशेष गाडयांच्या फेऱया सोडल्या आहेत. पुणे-सावंतवाडी, सावंतवाडी-पनवेल अशा या आठ विशेष गाडय़ा धावणार असून त्यांच्या तिकिटांचे आरक्षण उद्या, 18 मार्चपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या फेऱयांना वैभववाडीलादेखील थांबा देण्यात आला

ट्रेन क्र. 01417-पुणे-सावंतवाडी (चार फेऱया) – ही विशेष गाडी 20 मार्च आणि 24 मार्च रोजी पुण्याहून पहाटे 4.55 वाजता सुटणार असून सावंतवाडीला त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहचणार आहे.

ट्रेन क्र. 01418- सावंतवाडी-पुणे ट्रेन – ही परतीच्या प्रवासाची ट्रेन सावंतवाडीहून 22 मार्च आणि 24 मार्चच्या रात्री 8.30 वाजता सुटणार असून पुण्याला दुपारी 12.25 वाजता पोहचणार आहे.

थांबा-लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड ,कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

ट्रेन क्र. 01416-पनवेल-सावंतवाडी (4 फेऱया) ही विशेष गाडी 21 मार्च आणि 22 मार्च रोजी (दोन फेऱया) पनवेलहून सकाळी 8.15 वाजता सुटणार असून सावंतवाडीला त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहचणार आहे.

ट्रेन क्र. 01415-सावंतवाडी-पनवेल ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 20 आणि 21 (दोन फेऱया) मार्चला रात्री 8.30 वाजता सावंतवाडीहून सुटणार असून पनवेलला सकाळी 7.20 वाजता पोहचणार आहे.

थांबा-रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

सीएसएमटी ते वाराणसी (01067) या विशेष गाडीच्या दोन फेऱया, सीएसएमटी ते पाटणा (02053) या विशेष गाडीच्या दोन फेऱया तर सीएसएमटी-मंदोडीह (01085) विशेष गाडीच्या दोन फेऱया असणार आहेत. या विशेष गाडीचे आरक्षण 17 मार्चपासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. तर कोकणातील विशेष फेऱयांचे आरक्षण उद्या, 18 मार्चपासून उपलब्ध होणार आहे.