
सामना प्रतिनिधी । पूर्णा
परळी वैजनाथ येथे एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी पूर्णा पोलिसांनी त्याचा तपास करत दोन आरोपींना गजाआड केले आहे. तसेच आरोपींनी खून केल्यानंतर प्रेत पुरलेलेल्या जागेवर जाऊन पोलिसांनी मयत तरुणाचे प्रेतही उकरून काढले. या प्रकरणात आणखी चार आरोपी असून पोलीस आरोपीसह प्रेम प्रकरणातील मुलीचाही शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध बहरत गेले आणि घरच्यांच्या विरोधामुळे दोघे सैराट झाले. परंतु घरच्यांनी मनधनी केली आणि प्रेमी जोड्याला लग्न लावण्याचे आश्वासन दिल्याने दोघेही घरी परटले. परंतु त्यानंतर मुलीकडील नातेवाईकांनी कट रचला व मुलाचा खून केला.
परळी (वै.) येथील अजय अशोक भोसले (17, रा.गौतमनगर) यांचे 17 फेब्रुवारीला पूर्णा रेल्वेस्थानक परिसरातून सहा जणांनी अपहरण केले. मुलाची आई मंगलबाई अशोक भोसले यांच्या फिर्यादीवरून परळी (वै.) येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात 3 मार्च रोजी आरोपी शक्तीसिंग बाबरी व बच्चनसिंह बावरी यांच्यासह एकूण 6 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक सुभाष राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले.
यांनतर परळी रेल्वे स्थानक परिसरातून फौजदार पवार यांच्या पथकाने 18 मार्चला रोजी शक्तीसिंग बावरी व बच्चनसिंग बावरी यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. पूर्णा न्यायालयाने सुनावलेल्या 6 दिवसांच्या पोलीस कोठडीतील या 2 आरोपींनी पूर्णा पोलीसांना सांगितले की, अजय भोसले याने आमच्या बहिणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला काही महिन्यापुर्वी पळवून नेले होते. त्यामुळे आमचा त्याच्यावर राग होता. आम्ही त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी शहरात तुमचे लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर या दोघांना घेऊन दोन आरोपी व त्यांचे चार साथीदार हे परळी येथे आले. त्यानंतर सहा जणांनी मिळून अजय भोसले यांस काठी मारुन त्याचा खून केला व त्याचे प्रेत परळी शहरातील थर्मल कॉलनीच्या संरक्षकभिंती जवळ पुरले.
सदरील कबुली जबाबनंतर 25 मार्च रोजी पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या साथीदारांनी आरोपीस सोबत घेऊन परळी गाठली व खड्ड्यात पुरलेले प्रेत 40 दिवसांनंतर बाहेर काढले. त्याच ठिकाणी परळी येथील तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी पोलिस यांच्या समोर प्रेताची उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आरोपी शक्तीसिंग बावरी व बच्चनसिंग बावरी यांना पूर्णेत आणून त्यांच्या विरोधातील गुन्ह्यात वाढ केली. आरोपींना पूर्णा प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असून त्यांना आहेत.


























































