
>> कर्नल अभय बा. पटवर्धन
जो देश उपग्रहांना जॅम करू शकतो किंवा ध्वस्त करू शकतो तो शत्रूचे संगणकीय दळणवळण, येणाऱया क्षेपणास्त्राची माहिती आणि/किंवा सैनिकी हालचालींच्या माहितीचा प्रपात थांबवू शकतो. हिंदुस्थानने केलेल्या ‘मिशन शक्ती’मुळे शत्रुराष्ट्रांच्या अंतराळातील कुटील इराद्यांवर (स्पेस मिसऍडव्हेन्चर) यापुढे वचक बसेल यात शंकाच नाही. आज हिंदुस्थानचे जवळपास 48 उपग्रह अंतराळात फिरत आहेत. त्यांचे संरक्षण करणारी उपग्रहभेदी क्षेपणास्त्र्ा प्रणाली यशस्वीपणे वापरण्याची क्षमता हिंदुस्थानकडे आहे हे जगाला आजवर ज्ञात नव्हते. 27 मार्चला केलेल्या ए-सॅटच्या यशस्वी परीक्षणामुळे आपण अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर जगातील चौथी ‘अंतराळ महासत्ता’ (स्पेस पॉवर) बनलो आहोत. यापुढील काळात हिंदुस्थानला ‘सॅटेलाईट टू सॅटेलाईट’ म्हणजेच उपग्रहाने उपग्रह नष्ट करणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. हिंदुस्थानला अंतराळ वर्चस्व राखायचं असेल तर ही पावलं उचलणं अनिवार्य ठरणार आहे.
अमेरिका, रशिया व चीननंतर जमिनीपासून दोन हजार किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये भ्रमण करणाऱया शत्रूच्या उपग्रहाला ध्वस्त करण्याची क्षमता असणारा हिंदुस्थान हा जगातील चौथा देश झाला आहे. आपल्या अंतरिक्षातील जंगम मालमत्तेचे रक्षण करण्याची क्षमता हिंदुस्थानात आहे हे आपण 27 मार्च रोजी जगाला दाखवून दिले. हिंदुस्थानने ही क्षमता मिळवताना जॅमिंग, फ्लाय बाय टेस्ट प्रणालींचा वापर न करता विध्वंसक प्रणाली उपयोगात आणली. सध्या अवकाशात भ्रमण करत असलेले हिंदुस्थानचे किमान 48 उपग्रह शत्रूसाठी ‘सीटिंग डक्स’ आहेत. त्यामुळे अंतरिक्षातील आपले हे शक्तिप्रदर्शन हिंदुस्थानने शत्रूवर केलेला एक प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेस फोर्स अर्थात अंतरिक्ष सैन्य बनवण्याची घोषणा केली होती. 2020 पर्यंत अमेरिकेला हे नवे सैनिक तयार करायचे आहेत. या घोषणेतून ट्रम्प यांनी एक प्रकारे अंतरिक्ष ही भविष्यकाळातील रणभूमी बनणार असल्याचे सूतोवाचच केले होते. आपल्या ‘मिशन शक्ती’ला ट्रम्प यांच्या या विधानाची पार्श्वभूमी नसली तरी भविष्यातील हा अंदाज विचारात घेऊन हिंदुस्थानने उपग्रहभेदी क्षेपणास्त्र्ााची यशस्वी चाचणी केली असे म्हणता येईल.
‘ऑण्टिबॅलॅस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्रॅम’ आणि अग्नी सीरिज मिसाईल्समुळे उपग्रहभेदी हत्यार प्रणाली (ऑण्टि सॅटेलाईट वेपन्स सिस्टीम) आपल्याकडे 2012 मध्ये तयार होती. मात्र हिंदुस्थानी इस्रोच्या ‘मिशन मार्स’ आणि जियो सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलच्या (जीएसएलव्ही डी-5) माध्यमातून दोन टन वजनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतरिक्षात सोडण्याची क्षमता हिंदुस्थानकडे उपलब्ध झाल्यामुळे डीआरडीओला पृथ्वी किंवा चंद्राभोवती फिरणाऱया ‘ऑर्बिटल वेपन्स’ना विकसित करण्याची संधी मिळाली. आगामी सात-आठ वर्षांमध्ये हिंदुस्थान ऍण्टी सॅटेलाईट वेपन्स तयार करू शकेल असे भाकीत आंतरराष्ट्रीय संरक्षणतज्ञांनी 2011 मध्येच केले होते.
‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्याने यापुढे हिंदुस्थान अंतरिक्षात 300-1000 किलोमीटर उंचीवर असलेले शत्रूचे उपग्रह ध्वस्त करू शकेल. अंतरिक्षात अति उंचावर भ्रमण करणारा शत्रूचा उपग्रह प्रचंड वेगाने प्रवास करणाऱया टिंबासारखा असतो. त्याचा विध्वंस करणे अशक्यप्राय नसलं तरी त्यासाठी तेवढीच विकसित हत्यार प्रणाली आवश्यक असते. तसे पाहिले तर 2012मध्ये ज्यावेळी हिंदुस्थानने अब्दुल कलाम बेटावरून (पूर्वीचे व्हिलर बेट), पाच हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी-5 आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रणालीची (इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाईल) सफल चाचणी केली त्याच वेळी हिंदुस्थाने उपग्रहभेदी क्षेपणास्त्र्ा अंतरिक्षात डागण्याची क्षमता प्राप्त केली होती असे प्रतिपादन डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे तत्कालीन प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी केले होते. मात्र त्यांच्या प्रतिपादनानुसार, तत्कालीन सरकारने याला ‘गो अहेड’ दिला नव्हता. सध्याच्या सरकारने तो आदेश दिला. किंबहुना 27 मार्चच्या कारवाईत हिंदुस्थानने उपग्रहाला ध्वस्त करणाऱया त्याच किंवा त्यापेक्षाही वेगवान नवीन प्रक्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला असण्याची शक्यता आहे. ‘एक्सो ऍटमॉस्फेरिक’ वातावरणात वेगाने येणाऱया प्रक्षेपणास्त्राचा विध्वंस करण्याची क्षमता (मिसाईल इंटरसेप्शन) हिंदुस्थानकडे 2018पासूनच आहे आणि ‘इंडिया इज मेकिंग ऑण्टिसॅटेलाईट वेपन’’ हे डीआरडीओ चीफ एस. ख्रिस्तोफर यांनी 29 मे 2018ला सांगितले होते. बॅंक्स, एटीएम्स आणि दळणवळणासाठी प्रामुख्याने उपग्रहांवर अवलंबून असणारी जागतिक व राष्ट्रीय अर्थव्यवस्था ऑण्टिसॅटेलाईट वेपन्समुळे कोलमडून पडू शकते. कुठल्याही देशाकडे उपग्रहभेदी हत्यार प्रणाली असण्याचा हा फार मोठा फायदा आहे.
ऑण्टि सॅटेलाईट वेपन सिस्टीम विकसित करण्यासाठी स्पेस बेस्ड सेन्सर्स, सिंथेटिक अपर्चर रडार्स, इलेक्ट्रॉनिक्स, साऊंड नेव्हिगेशन सिस्टम, गायडन्स अँड कंट्रोल सिस्टम आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमची आवश्यकता असते. कुठलीही गोष्ट पाहण्यासाठी, शोधण्यासाठी व तिचा वेध घेण्यासाठी या वेपन सिस्टममधे इन्फ्रारेड सेन्सर्स, ऑप्टिकल सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक ऑप्टिकल सेन्सर्स नि मॅग्नेटिक सेन्सर्स बसवले जाणे अत्यावश्यक असते. उपग्रहभेदक हत्याराचा वापर करताना, अंतरिक्षातील इतर उपग्रहांना होणाऱया अनुषंगिक हानीचासुद्धा विचार करावा लागत असल्यामुळे याची आवश्यकता भासते. हिंदुस्थानजवळ ही क्षमता आहे यावर जगाचा विश्वास नव्हता. यासाठी हिंदुस्थानच्या उपग्रहभेदक प्रणालीचे परीक्षण जगासमोर होणे आवश्यक होते, अर्थात, आता हे परीक्षण झाल्यामुळे हिंदुस्थानी उपखंडात परत एकदा शस्त्र्ाास्त्र्ा स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर त्यामुळे अंतरक्षीय भंगार (स्पेस डेब्रिस) निर्माण झाले तर हिंदुस्थानवर आंतरराष्ट्रीय निर्बंध घातले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे ‘ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी’ आणि ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री’मधील आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो. हिंदुस्थान ‘इंटर एजन्सी स्पेस डेब्रिस को-ऑर्डिनेशन कमिटी’चा सदस्य असल्यामुळे जर हिंदुस्थानने केलेल्या या परीक्षणामुळे अंतरिक्षीय भंगार निर्माण झाले तर या संघटनेत हिंदुस्थानची मानहानी होईल हेदेखील स्पष्ट आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात सांगितले त्यानुसार, केवळ 300 किलोमीटर उंचीवर केल्या गेलेल्या या परीक्षणामुळे अंतरिक्षीय भंगार निर्माण झालेले नाही. कारण ते गुरुत्वाकर्षणाच्या ओढीने खेचले जाऊन काही आठवडय़ांमध्येच पृथ्वीवर येताना जळून खाक होतील.
ही सर्व चाचणी कायदेशीर चौकटींची सीमा लक्षात घेऊन पार पाडण्यात आली हेही एक वैशिष्टय़ आहे, पण भविष्यात अंतराळाला येणारे महत्त्व लक्षात घेता आणि त्यादृष्टीने या क्षेत्रातील शस्त्र्ाास्त्र्ा तंत्रज्ञानाला येणारे महत्त्व पाहता कदाचित यासंदर्भात नव्याने एखादा ‘स्पेस वेपनायझेशन’ करार आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात येऊ शकतो. कारण अमेरिका आणि रशियाने हे तंत्रज्ञान विकसित केले होते तेव्हाच चीनने आक्षेप घेत सर्वच देशांनी ते करता कामा नये असे म्हटले होते.
हिंदुस्थानने केलेल्या ‘मिशन शक्ती’मुळे यापुढे शत्रुराष्ट्रांच्या अंतराळातील कुटील इराद्यांवर (स्पेस मिसऍडव्हेन्चर) वचक बसेल यात शंकाच नाही. मात्र याबरोबरच अंतरिक्षविषयक जागृती, उपग्रहांच्या जॅमिंगवर भर आणि भविष्यात बॅकअप सॅटेलाईट कॅपेबिलिटी वृद्धिंगत करण्यावर आणि लेझर ब्लाइंडिंग, कम्युनिकेशन जॅमिंगवरही जोर द्यावा लागेल. आज हिंदुस्थानचे जवळपास 48 उपग्रह अंतराळात फिरत आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही प्रणाली किंवा व्यवस्था आजवर हिंदुस्थानकडे नव्हती. ए-सॅटचे परीक्षण हे यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. यापुढील काळात हिंदुस्थानला ‘सॅटेलाईट टू सॅटेलाईट’ म्हणजेच उपग्रहाने उपग्रह नष्ट करणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. त्याच्याच बरोबरीने जोर देणे आवश्यक असेल. हिंदुस्थानला अंतराळ वर्चस्व राखायचं असेल तर ही पावलं उचलणं अनिवार्य ठरणार आहे.
हिंदुस्थानने 300 किलोमीटर उंचीवर असलेल्या ‘लाइव्ह’ उपग्रहाला केवळ तीन मिनिटांमधे भेदून (मूव्हिंग सॅटेलाईट ) चीन व पाकिस्तानच्या उरात धडकी भरवली आहे हे त्या देशांच्या प्रतिसादावरून लक्षात येते. पृथ्वीभोवती असंख्य देशांचे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत फिरत असतात. आपल्याला ज्या उपग्रहांवर, पर्यायाने देशांवर लक्ष ठेवायचं आहे त्या देशांच्या कक्षेत उपग्रह सोडून हेरगिरी करण्याची महाशक्तींची जुनी परंपरा आहे. पोखरणच्या वेळी अमेरिकेच्या उपग्रहाला आपण कसा चकमा दिला होता हे वाचकांच्या ध्यानात असेलच. आता चीनही तेच करतो आहे. मात्र आता आपणदेखील तशीच क्षमता प्राप्त केली असल्याने ‘लो ऑर्बिट सॅटेलाईट’ना हिंदुस्थान कधीही उद्ध्वस्त करू शकतो.
अंतरिक्ष युद्धातील सर्वात मोठे शस्त्र
उपग्रहभेदक हत्यार प्रणाली हे स्पेस वॉर किंवा अंतरिक्ष युद्धातील सर्वात मोठे शस्त्र्ा मानले जाते. कारण प्रत्येक देशाचे अनेक प्रकारचे उपग्रह अंतराळात फिरत आहेत. अशा वेळी एखाद्या देशाचा उपग्रह जेव्हा उद्ध्वस्त केला जातो तेव्हा त्या देशाची क्षमता कमी होत असते. त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर, समाजव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असतात. साठाव्या दशकातील शीतयुद्धाच्या वेळी सुरू झालेले अंतरिक्ष युद्ध आता चरमबिंदूवर आले आहे. उपग्रहांची सैनिकी क्षमता कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, अर्ली वार्ंनग सिस्टीम रिकोनिसन्स नि सिग्नल इंटेलिजन्ससाठी उपयुक्त असते. ज्या देशांकडे उपग्रह प्रणालीचा विध्वंस करण्याची क्षमता असते त्यांची अंतरिक्ष युद्धात सरशी होण्याची संभावना कैक पटींनी वृद्धिंगत झालेली असते. जो देश उपग्रहांना जॅम करू शकतो किंवा ध्वस्त करू शकतो तो शत्रूचे संगणकीय दळणवळण, येणाऱया क्षेपणास्त्राची माहिती आणि/किंवा सैनिकी हालचालींच्या माहितीचा प्रपात थांबवू शकतो. चीनने आपल्या ‘ग्राऊंड बेस्ड हाय अर्थ ऑर्बिट अटॅक मिसाईल’, ‘ऑण्टिसॅटेलाईट डाँग नेंग 2’चे परीक्षण 2013 मध्येच केले होते. ही एक प्रकारची ‘रोड मोबाईल बॅलेस्टिक मिसाईल सिस्टीम’ होती. त्याआधी चीनने 2007 मध्ये, केटी 1 रॉकेटने त्याच्या 800 किलोमीटर उंचीवरील ‘फेंग युंग 1 सी वेदर सॅटेलाईट’ला लो अर्थ ऑर्बिटमध्ये ध्वस्त केलं होतं. त्याचे तुकडे आजही अंतरिक्षात भ्रमण करत आहेत. 2013 मध्ये या तुकडय़ांनी रशियन उपग्रहाला मोठी क्षती पोहोचवून तो नष्ट केला होता. चीनजवळ ही प्रणाली असल्यामुळे आणि तो पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे या दोन्ही शत्रूंना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी हिंदुस्थानला उपग्रहभेदक प्रणालीचा पूर्ण विकास करणे आवश्यक होते.





























































