अंबाजोगई शहरात गारांचा पाऊस, नागरिकांची तारंबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hail-storm

सामना प्रतिनिधी । आंबाजोगई

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेचा तडाखा बसत असतानाच अंबाजोगाई शहरात आज दुपारी अचानक वातावरण बदलले. अंबाजोगई शहरासह परिसराच्या भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात विजेच्या कडकडाटासह गाराचा पाऊस सुरू झाला. अचानक सुरू गारांचा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारंबळ उडाली. या गारपीटीचा फटका शेतीला देखील बसला असून आंबा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अंबाजोगई शहरासोबतच बीड जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.