
सामन क्रीडा प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थानची 13 वर्षीय दिव्या देशमुख ही 14 वर्षांखालील गटात बुद्धिबळ विश्वातील ‘नंबर वन’ खेळाडू ठरली आहे. ही उपलब्धी मिळविणारी ती कोनेरू हंपीनंतरची दुसरी हिंदुस्थानी बुद्धिबळपटू ठरली आहे. दिव्याची ईएलओ रेटिंग 2432 आहे. या रेटिंगसह तिने ज्युनियर गटात (20 वर्षांखालील) पाचवे स्थान मिळविले. टॉप-10 मध्ये स्थान मिळविणारी ती एकमेव हिंदुस्थानी बुद्धिबळपटू ठरली. दिव्या देशपांडे ईएलओ रेटिंगमध्ये हिंदुस्थानच्या महिला बुद्धिबळपटूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.


























































