‘स्मार्ट सिटी’त नागपूर देशात अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत नागपूर शहरात प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. यामुळेच गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूर पहिल्या स्थानावर होते. सध्या साप्ताहिक आधारावर नवीन यादी जारी केली जाते.

अनेक दिवसांपासून नागपूर दुसऱ्या क्रमांकावर होते. गुजरातमधील अहमदाबाद शहर पहिल्या क्रमांकावर होते. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूरला पुन्हा एकदा पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये नागपूरला 367.42 अंक मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या अहमदाबादला 367.36 अंक मिळाले आहे.