
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दक्षिण कश्मीरमधील लेथपोरा येथे 30 डिसेंबर 2017 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर केलेल्या हल्ल्यातील दुसरा खतरनाक दहशतवादी सईद अंद्राबी याला ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. याआधी याच हल्ल्यातील आणखी एक दहशतवादी निसार तांत्रे याला आणि गेल्याच महिन्यात फय्याज अहमद माग्रे याला एनआयएने अटक केली. 35 वर्षीय अंद्राबी हा जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यात राहणारा आहे.



























































