बीडमध्ये निवडणूक प्रशिक्षण शिबिराचा मंडप कोसळला, सहा जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । केज 

लोकसभा निवडणुकीसाठी वसंत महाविद्यालयातील प्रशिक्षण शिबीर स्थळी उभारलेला मंडप अचानक आलेल्या वादळाने कोसळला. यात सहा प्रशिक्षणार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी 3.30  वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकसभा निवडणुकीसाठीचे दुसरे प्रशिक्षण शिबीर केज येथील वसंत महाविद्यालयात सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी रविवारी दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षणार्थींना बसण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वारा आल्याने मंडप खाली कोसळला. यात सहा प्रशिक्षणार्थी जखमी झाले आहेत.